अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अलैहि व सल्लम) यांच्या विरुद्ध केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला,तसेच समाजातर्फे शर्मिष्ठा विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी
मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली, केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
आदर आणि प्रतिष्ठेची मागणी करण्यात आली.
सम्बायोसिस काॅलेज,पुणे येथील पी आर शर्मिष्ठा या विधार्थीने प्रषितांवर अभद्र विधाने केल्या बद्दल कठोर कारवाई करावी, आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी मुस्लिम समाजा तर्फे करण्यात आली या निवेदनाच्या प्रति अमळनेरचे प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावर साहेब यांच्या मार्फत माहामहिम राष्ट्रपति,भारताचे प्रधानमंत्री , गृहमंत्री, यांना देण्यात आल्या आहेत त्यात पुढे म्हंटल आहे कि, आम्हाला विश्वास आहे कि शासन प्रशासन या प्रकरणात योग्य ती करवाई केरल आणि धार्मिक सालोखा रखण्यास हातभार लावेल.
धार्मिक सालोख्याचा संदेश
आम्ही सर्वाना धार्मिक सालोखा आणि परस्पर आदर वाढवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करतो, समाजात शांतता आणि सुव्यवस्था रखण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करूं शकतो अशा आमचा विश्वास आहे.
प्रांत अधिकारी यांना मौलाना रियाज़ शेख यांनी निवेदन सार्वजनिकरित्या वाचून दाखवली आणि ते स्वीकारल्यानंतर मुस्लिम समुदायात असलेल्या संतापाची माहिती दिली आणि शर्मिष्ठावर त्वरित कार्रवाई करण्याची मागणी केली.
निवेदन देतांना मौलाना रियाज़ शेख, इकबाल कुरेशी, अल्तमश शेख, आकिब अली, इमरान भाया, शाहरुख सिंगर, मोहसिन जडी बुटी, हाफीज़ तौसीफ, इमरान शेख हाजी कादर जनाब, फैजान शेख, रिज़वान मनियार,अफजान शेख आदि मान्यवर उपस्थित.
