अमळनेर:(प्रतिनिधी )नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच अमळनेरच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत अमळनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या संख्येने युवक प्रवेश करत आहेत.
आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या विकास कामांना, त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला आणि कार्यशैलीला पाठिंबा देत शहरातील अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या पैलाड भागातील अनेक महत्त्वाच्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
येणारी नगरपरिषद निवडणूक योग्य उमेदवार निवडून खऱ्या अर्थाने प्रभागाचा व अमळनेर शहराचा विकास व्हावा, या एकाच उद्देशाने 'खली बाबा मित्र परिवार' मधील महत्त्वाच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे.
प्रवेश करणाऱ्या युवक पुढीलप्रमाणे
यावेळी संदीप बापू भोई (खली बाबा), संजय भिला पाटील, भिला गंगाराम पाटील, बाळू पाटील, नानजी पाटील, आकाश भोई, विजय पाटील, गणेश पाटील, शैलेश पाटील, राहुल पाटील, राहुल भोई, विकी सपकाळे, हर्षल सुतार, हर्षल भोई, गणेश भोई, पिंटू भोई, आरिफ पठाण, सुजित पाटील, राकेश भोई, राज मालचे, अजय भोई, पवन पाटील, तेजस पाटील, योगेश पाटील, भूषण धनगर, राहुल बिल, विशाल बिऱ्हाडे, अतुल धनगर यांसह 'खली बाबा मित्र परिवार'मधील अनेक युवकांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पैलाड भागात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तरुणाईचा हा वाढता पाठिंबा निवडणुकीत पक्षासाठी निर्णायक ठरणार आहे.
खान्देश समाचार...
