अमळनेर (प्रतिनिधी )येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी बालवाडी विभागाचे स्नेहसंमेलन भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 31 रोजी आनंदात साजरे झाले.
बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली महाजनसह सर्व शिक्षकांनी गेल्या महिनाभरा पासून प्रत्येक वर्गाची ग्रुप डान्स नर्सरी शिसोदे मॅडम आणि नाटिका वैभवी मॅडम अशी सर्वांनी तयारी करून सुंदर पद्धतीने सादरीकरण केले. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यासोबत विविध नृत्य सादर करून महिला पालकांनी मनोरंजनात्मक खेळ सुद्धा खेळून उत्साह दाखविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर, संचालक प्रा.एस.जे.शेख, किरण पाटील, मगन पाटील व सर्व कार्यकारी मंडळ आणि चारही शाळेचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीने दीप प्रज्वलन प्रतिमापूजन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालवाडीच्या विद्यार्थिनींनी आणि अनिता पाटील, भारती बडगुजर, अश्विनी लांडगे, निकिता महाजन यांनी नृत्यातून स्वागत गीत सादरीकरण केले. घोरपडे सरांनी सर्वांचे कौतुक करून पालकांना लहान बालका विषयी नाच गाण्याचे महत्त्व पटवून कौतुककास्पद शुभेच्छा देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.लतिका शिंगाणे, सौ.अश्विनी लांडगे यांनी केले. तर मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम उत्साहात पार पडला. सौ.ज्योती सोनार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.
खान्देश समाचार...
