जळगाव(प्रतिनिधी) जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे दिनांक २३ मार्च २०२५ रोजी अखिल भारतीय श्री गुरु सेवा मंडळ जिल्हा अमरावती तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ जळगाव ( खान्देश ) यांच्यामार्फत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व धर्म समभाव राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय विशेष गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर पुरस्कार सोहळ्यात चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजासाठी विविध आंदोलने मोर्चे व समाजहितासाठी नेहमी धावून जाणारे नागलवाडी या गावातील रहिवासी मा.भिवराज रायसिंगे यांना आपल्या विशेष कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार भगवान गौतम बुद्ध विश्वशांती समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार प्राप्त झाल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांतर्फे त्यांचे अभिनंदन होत आहे.खान्देश समाचार...
