मुंबई :(प्रतिनिधी) पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी शासनातर्फे निधी देण्यात येतो. यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते.
राज्यातील २७८६१ ग्रामपंचायतींना १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बंधित अनुदानाचा (टाईड) पहिल्या हप्त्यापोटी 1292.10 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे.
हि रक्कम जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींच्या ICICI बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींना वाटपासाठी जिल्हा परिषदांच्या ICICI बँकेतील खात्यात सोबत जोडलेल्या प्रपत्र “अ” नुसार रक्कम जमा करण्यात येणार आहे.
या ग्रामपंचायतींना इतका निधी - जिल्हा परिषदांनी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना वाटपासाठी देण्यात आलेला एकूण निधी आणि संपूर्ण जिल्हयातील ग्रामपंचायतींची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) यांच्या गुणोत्तरास ग्रामपंचायतीच्या लोकसंखेने गुणीले असता त्या ग्रामपंचायतीस किती निधी देय होतो हे कळते. त्यानुसार ग्रामपंचायतीना निधीचे वाटप करण्यात येणार आहे.
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील बंधित अनुदानाचा पहिला हप्ता जमा झाल्यापासून ७ दिवसांच्या आत सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या अखत्यारीतील ग्रामपंचायतीच्या ICICI बँकेच्या खात्यात निधी जमा करणे आवश्यक आहे.
दरम्यान, ग्राम विकास विभाग 26-08-2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद/ पंचायत समिती/ग्रामपंचायत यांना ICICI बँकेत T + १ बचत खाते उघडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
खान्देश समाचार...

