अमळनेर : येथील नामांकित देवस्थानाच्या अध्यक्ष पदावर असलेले डिगंबर महाले हे प्रतिष्ठा व सन्मानाचा अनेक पदांवर काम करीत होते व आहेत. त्यामुळे त्यांचे समाजात मानाचे स्थान आहे. ते शैक्षणिक क्षेत्रात देखील अनेक वर्षांपासून मोठं मोठ्या पदांवर काम करीत आहेत. आरोपी असलेल्या चारही लोकांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध अनेक खोटे व बदनामीकारक आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरुद्ध 2014 साली जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे व इतर वेळी देखील खोटे व लबाडीचे आरोप केले होते. तक्रारदार हे अनुसूचित जातीचे आहेत व आरोपी सर्व हे सवर्ण आहेत. म्हणून जातीय द्वेषापोटी त्यांनी महाले यांना वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. एका अनुसूचित जातीचा व्यक्ती एखाद्या मोठ्या कोणत्याही पदावर अथवा त्यापेक्षा मोठे म्हणजे एखाद्या संस्थानाच्या अध्यक्ष पदावर पोहचतो तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखते अशी चर्चा सध्या सुरू आहे. अनेक वेळेस आरोपींनी महाले यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या मात्र सर्वच तक्रारींमध्ये ते निर्दोष आढळून आले.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या एका समरी अहवालावरून व अनेक प्रकारच्या चौकशी होऊन शेवटी आज डॉक्टर अनिल शिंदे, मुकुंद विसपुते,अरविंद सराफ, संदीप सराफ यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच भारतीय दंड संहिता कलम 182 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

