अमळनेर:-(प्रतिनिधी) अमळनेर येथील प्रबुद्ध विहारात समाज एकत्रीकरण अभियानाअंतर्गत महामाता रमाई यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता. अनेक मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला सेवानिवृत्त शिक्षक माननीय अरुण घोलप यांनी आपल्या मनोगतात माता रमाई यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विशद केले.
सेवानिवृत्त शिक्षिका मैराळे ताई, केंद्रीय शिक्षिका मंगलाताई सोनवणे यांनी आपले स्वमत मांडले. प्रांताधिकारी माननीय सीमा अहिरे यांनी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये हाल अपेष्टा सहन करून पतीला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाचे सहकार्य केले,तसेच प्रत्येक महिलांनी न थकता न डगमगता कुठलीही तक्रार न करता समाजस्वास्थ्यासाठी झटले पाहिजे रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आयोजकांनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल अभिनंदन केले.प्रास्ताविक मा.सिद्धार्थ सोनवणे यांनी केले कार्यक्रमाला समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभाग नोंदविला मा. विश्वास निकम, मा .संतोष नामदेव श्रीगणेश, प्रा.डॉ.विजय तुंटे,एडवोकेट रंजीत बिर्हाडे, मिलिंद निकम ,संदीप सैंदाने,प्रविण बैसाणे. सोमचंद संदानशिव,समाधान मैराळे, किरण बहारे, अर्जुन संदानशिव , सेवानिवृत्त पीएसआय इंगळे साहेब, सुरेश कांबळे,भूपेंद्र शिरसाठ इत्यादी अनेक महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खान्देश समाचार न्यूज

