अमळनेर:-(प्रतिनिधी)बंजारा समाजाचे धर्मगुरू व मानवता धर्म हाच खरा धर्म याचा प्रचार व प्रसार करणारे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आदरांजली वाहून संपन्न झाली. सर्वप्रथम कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेच्या शिक्षिका स्वप्ना विसपुते यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्याची ओळख प्रास्ताविकातून करून दिली. शाळेचे शिक्षक प्रशांत वंजारी यांनी संत सेवालाल महाराज यांचे समाज व त्यासोबत समस्त मानवजातीसाठी प्रबोधनात्मक जनजागृतीपर आणि अंधश्रद्धा च्या विश्वातून समाज प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याचे अमोल सुंदर व अलंकारिक भाषेत शब्दांकन केले. मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांनी सुद्धा संत सेवालाल महाराज यांचे समाज जागृतीपर, उन्नतीपर मानवतावादी कार्याचे मनोगतपर विचार अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. पर्यवेक्षिका एम.एस. बारी यांनी सुद्धा संत सेवालाल महाराज यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षिका एम. एस. बारी, ज्येष्ठ शिक्षक व्हि.पी. बडवे, महेश माळी, प्रशांत वंजारी समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे लाभले.
खान्देश समाचार न्यूज
