अमळनेर:-(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील काही गावात शहापूर कळमसरे वासरे मारवाड डांगरी इत्यादी गावात वादळी वारा तसेच अतिवृष्टीमुळे 22.1.2022 रोजी या शिवारात शेती पिक मका हरभरा गहू दादर इत्यादी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी आज पावत कोणताही शासकीय पंचनामा झालेला नाही ,झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी शेतकरी यांना दिलासा म्हणून आपण आपल्या स्तरावर पंखाळ पंचनामे करून शासन दरबारी पाठपुरावा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळवून द्यावी त्यासाठी अमळनेर मा.तहसीलदार यांना याबद्दल निवेदन देण्यात आले तालुका अध्यक्ष संदीप पाटील तालुका सचिव अरुण गव्हाणे शहराध्यक्ष धनंजय साळुंके मनसे सैनिक रावसाहेब पाटील व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
खान्देश समाचार न्यूज
