अमळनेर(प्रतिनिधी) येथील गुजरात महिला हाउसिंग ट्रस्ट सेवाभावी तसेच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात त्याचा एक भाग म्हणून 8 मार्च जागतिक महिला दिवस निमित्ताने अमळनेर येथील भगिनी मंडळ येथे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात अमळनेर येथील बंगाली फाईल, गांधलीपुरा,मिलचाल,रुबजी नगर, गलवाडे रोड, पैलाड, कुंभार टेक, ताडेपुरा इत्यादी भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महिलांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी महिलांनी नृत्य कविता नाटिका अभंग याद्वारे जनजागृती करण्यात आली तसेच कार्यक्रमात गुजरात महिला हाउसिंग ट्रस्ट च्या भगिनींनी उपस्थित महिलांना स्वच्छते विषयी पाण्याविषयी जलवायु इत्यादी विषयात मार्गदर्शन करण्यात आले तसेच उपस्थित महिलांच्या श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम गुजरात महिला हाउसिंग ट्रस्टच्या आशा पाटील, गीता पोटले,भारती दाभाडे, संध्या मराठे,दिपाली भोईटे,भारती सोनवणे,रुपाली शिंदे,रुपाली लाड,सुरभी सूर्यवंशी,ललिता वायकर,संगीता भावसार,मोहिनी सोनवणे, अरूणा ठाकूर, रेखाबाई वानखेडे इत्यादी महिलांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले..
खान्देश समाचार न्यूज
