जळगाव(प्रतिनिधी) जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी असंघटित कामगार व महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी गार्ड वर्कर्स युनियन तर्फे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे,त्याबाबत कामगार संघटनांमार्फत पत्रक देण्यात आले त्यातअसे नमूद करण्यात आले आहे की, मुख्य अभियंता निवास, तापी पाटबंधारे विभाग जळगाव यांचे निवासस्थानी दि.२४ नोव्हेंबर २०२१पासुन उपविभागिय अभियंता श्री. सी. के. पाटिल सो. यांच्या तोंडी आदेशाने ठेवण्यात आले होते.
सदर सुरक्षा रक्षकांचि वरील कार्यालयाने कार्योत्तर मंजुरी ही दिलेली आहे. मात्र वरील अभियंता यांनी सर्व नियम जवळुन पाच महिने काम केल्या नंतर त्यांना विना वेतन देता कामावरुन कमी करुन मेस्को ऐजन्सींचे सुरक्षा रक्षक कोणतीही कायदेशिर पुर्तता न करता निविदा न काढता ठेवण्यात आले. तसेच गेल्या दोन वर्षा पासुन वाघुर विभागास पुर्वी काम केलेले सुरक्षा रक्षकांस घेण्यात यावे यासाठी वारंवार पत्र व्यवहार करुनही संबधीत विभागाने प्रतिक्षा यादिवरील सुरक्षा रक्षकांची नेमणुक केलेली आहे. जी बेकायदेशीर आहे. तसेच या विषयावर जानेवारी २०२१ मध्ये ही उपोषण करण्यात आलेले आहे. तसेच जानेवारी २०२१ मध्ये सुरक्षा रक्षक मंडळाची बांद्रा मुंबई कार्यालयाने मैदाणी घेण्या बाबत मंजुरी दिली असता मात्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी यांना त्या कामासाठी वेळ नाही. सुरक्षा मंडळाचा कारभार हा अतिशय कासव गतीने सुरु असल्यामुळे सुरक्षा रक्षकांची राजरोसपणे पिळवणुक सुरु आहे. अधिकारी मात्र झोपेच सोंग घेवून कुठलेही काम वेळेवर न केल्यामुळे हजारो सुरक्षा रक्षकांना न्याय मिळत नाही. त्यासाठी राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभाग व महाराष्ट्र स्टेट सिक्युरीटी खालील मागण्यासाठी उपोषण करीत आहोत.

प्रमुख मागणी -१) मा. मुख्य अभियंता निवास तापी विभाग, महामंडळ येथे कमी केलेले सुरक्षा रक्षकांचा त्वरीत वेतन व नियुक्ती देण्यात यावी.
२) बेकायदेशीर ठेवलेले मेस्को चे सुरक्षा रक्षक यांना काढुन मंडळाचे सुरक्षा रक्षक नेमावे.
३) सरसकट सुरक्षा रक्षकांची मैदाणी चाचणी करावी. अश्या मागण्या आहेत.त्यावेळी
उपोषण कर्ता-१) सोमा कढरे अध्यक्ष (सु. र. युनियन ) २) पुनमचंद निकम (प्रदेश संपर्क प्रमुख) ३) सुरसिंग पाटिल (उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख) ४) गौतम पारवे (महाराष्ट्र सरचिटणीस) ५) फकिरा चव्हाण (जिल्हा अध्यक्ष) ६) राजेंद्र माळी (जिल्हाअध्यक्ष नंदुरबार) ७) शांताराम वसंत माळी(सुरक्षा रक्षक) ८) विजय निंबा महाले (सुरक्षा रक्षक) ९) गणेश कैलास मराठे (सुरक्षा रक्षक).इत्यादी कामगार तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.