अमळनेर(प्रतिनिधी) 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये योगासन व त्याच्यासोबत त्याचे मानवी जीवनात अनन्यसाधारण असलेले महत्त्व योगाचार्य शाळेचे क्रीडा शिक्षक महेश माळी सर यांनी विषद केले. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांनी सरस्वती पूजन करून केली. योगाचार्य महेश माळी यांनी भुजंगासन, सुखासन, ताडासन, चक्रासन, शवासन, भ्रमरी, कपालभाती अशा नानाविध योग त्यांनी समस्त उपस्थित विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्तम रित्या शिस्तबद्ध तालबद्ध स्वरूपात करून घेतले. आजच्या धावपळीच्या जीवनात येणारे ताण-तणाव, चिडचिडपणा, अस्वस्थपणा अशा अनेक नानाविध बाबीवर विजय प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे योग होय. अशा सुंदर मार्मिक अलंकारिक शब्दात योगाबद्दल महत्त्व विषद केले आज शाळेत या कार्यक्रमामुळे योगमय वातावरण निर्माण झाले होते. मुख्याध्यापक जे.एस.देवरे यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिवसाबद्दल मंगलमय योगामुळे हार्दिक शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे.एस.देवरे, पर्यवेक्षिका एम. एस. बारी, प्राथमिक पर्यवेक्षिका आर.यु. पाटील, ज्येष्ठ शिक्षक महेश माळी, व्हि.पी. बडवे, खुशी बग्गा, प्रशांत मालुसरे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे लाभले.
खान्देश समाचार न्यूज
