अमळनेर( प्रतिनिधी )अमळनेर तालुक्यातील अंबारे येथे शेतकरी लालचंद माधवराव पाटील यांच्या शेतामध्ये कोळपणी करत असताना ,मेघ गर्जने सह पावसाला सुरुवात झाली होती. साधारणता काल साडेचार वाजेच्या सुमारास बैलांना उभे करून सालदार व मालक दोघही झाडाच्या आडोशाला उभे राहिले.अचानक प्रचंड मोठा आवाज आला गर्जना झाली व बैलांच्या अंगावर वीज कोसळली विजेचा आवाज इतका प्रचंड होता की दोघे इसमांच्या कानठळ्या बसल्या. ज्या बैलांवर वीज कोसळली तो बैल जागीच गतप्राण झाला .व एका बैलाला गंभीर दुखापत झाली मालक व सालदार थोडक्यात बचावले मालकाला काही सुचत नव्हते, तो सैरावैरा धावू लागला.गावातील लोकांनी तलाठी आणि पशु वैद्यकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी ने संपर्क करून सर्व माहिती सांगितली पशुवैद्यकीय अधिकारी अधिकारी यांनी पंचनामा करून एका बैलावर उपचार केला,तसेच तलाठी आप्पासाहेब जळगावला गेले असल्याने ,ते येऊ शकले नाही. संबंधितांनी त्वरित लक्ष केंद्रित करून गरीब शेतकऱ्याच्या मेलेल्या बैलाचा पंचनामा करून, त्वरित मदत जाहीर करावी अशी ग्रामस्थांची मागणी केली आहे .
खान्देश समाचार
