अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी आपल्या गटाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आले आहे. काल माजी आमदार यांच्या कार्यालयात माजी नगरसेवकासह, इच्छुक आणि नवीन उमेदवारांशी संवाद साधताना माजी आमदार चौधरी यांनी सध्याची निवडणूक ही कशी लढवावी यासाठी कालची बैठक संवाद साधून राज्याच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबई येथे रवाना झाले. विद्यमान महाराष्ट्राचे सरकार हे प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे सरकार आहे, मी आमदार असताना जो जास्तीत जास्त निधी दिला होता. त्याच पद्धतीने आपणास आताही भरघोष उपलब्ध करून देतील असाही विश्वास व्यक्त केला.
राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना जास्तीचा वेळ न देता मतदान प्रणालीचे वेळापत्रक जाहीर केल्याने उमेदवारांसह प्रशासनाची खूपच धावपळ उडाली आहे परंतु माजी आमदार यांनी शहरात विविध विकास कामांना प्राधान्य दिले होते त्याचप्रमाणे आताही जनता ही पाठीशी उभी राहील आणि माझ्या गटांकडून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना नक्की विजयी करतील असेही विश्वास व्यक्त केला. इच्छुक उमेदवार हे प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधत आहे त्यातून आपला प्रभाग निश्चित करताना दिसत आहेत. उमेदवारांची संख्या ही जास्त होत असल्याने यातूनही मार्ग काढू असाही विश्वास त्यांनी आपल्या बैठकीच्या मार्गदर्शनातून व्यक्त केला.
खान्देश समाचार न्यूज,अमळनेर
