अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2022 तथागत गौतम बुद्ध सांस्कृतिक केंद्र, फरशी रोड, अमळनेर येथे आयोजित केली आहे. आश्विन पौर्णिमेला उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रथम बुद्ध वंदना व बुद्ध पूजा घेण्यात आली. त्यानंतर उद्घाटक नरेंद्रभाऊ रामभाऊ संदानशिव (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद व माजी नगरसेवक) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष बापूराव संदानशिव यांनी केले. प्रमुख वक्ते तालुकाध्यक्ष द.रू.सैंदाणे गुरुजी यांनी गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी हरिभाऊ वाघ, सुनील करंदीकर, अरुण घोलप, श्रीकांत खैरनार, आकाश संदानशिव, गौतम सोनवणे, अनुराग सोनवणे, अर्जुन कढरे, गौतम सोनवणे, यांची प्रमुख उपस्थिती होती. या वर्षावास प्रवचन मालिकेत जिल्हाध्यक्ष ॲड. दिनकर संसारे आणि जिल्हा कार्यकारणी यांच्या मार्गदर्शनानुसार दर रविवारी आणि पौर्णिमा या दिवशी विविध विषयांवर धम्म प्रवचन होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन तालुका व शहर कार्यकारिणीने केलेले आहे.
खान्देश समाचार,अमळनेर.
