अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील धार येथे हजरत सैय्यद अब्दुल रज्जाक शाह पिरबाबा यांच्या सालाबादप्रमाणे उर्स यात्रा दि.4 ऑगस्ट गुरूवार रोजी होणार आहेत.
आपल्या खानदेशातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या अमळनेर तालुक्यातील धार या गावी पिरबाबांची दर्गा आहे,येथे हिंदु मुस्लिम समाजाच्या दररोज शेकडो भाविक येतात तसेच उर्स यात्रेसाठी गुजरात, मध्य प्रदेश,व राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात इसलामी महिन्याच्या प्रथम महिना मोहरमच्या पाच तारखेला दर वर्षी उर्स यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो मागील दोन वर्षांपासून कोरोना या महामारी मुळे यात्रा रद्द करण्यात आली होती.परंतु यंदा यात्रेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि.3 ऑगस्ट बुधवारी रोजी संदल तर दि.4 ऑगस्ट गुरूवार रोजी उर्स यात्रा होणार आहे.तसेच उर्स यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी चारचाकी, मोटरसायकल, रिक्षा, बस व आदि वाहने येणाऱ्या जाणाऱ्यानी सावकाशपणे यावे,तसेच एक दुसर्यांना सहकार्य करावे गर्दीत लहान मुलांना सांभाळावे असे आवाहन हजरत सैय्यद अब्दुल रज्जाक शाह पिरबाबा धार शरीफ येथील मुजावर पंच कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
खान्देश समाचार,अमळनेर
