अमळनेर(प्रतिनिधी)भारतात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना श्रीमती द्रौ.रा कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतःच्या हाताने राख्या बनविल्या आहेत.राख्या बनवण्यासाठी त्यांनी सर्व साहित्य घरून आणले होते.
विद्यार्थिनींना राखी बनवण्याचे प्रशिक्षण कलाशिक्षक व करुणा क्लब प्रमुख श्री दिनेश पालवे यांनी दिले. राख्या बनविने या उपक्रमासाठी शाळेचे चेअरमन श्री. प्रदीप अग्रवाल यांनी प्रेरणा दिली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस.एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री सी.एस. पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती.एस.पी.बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्यांचे सर्वांसाठी प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेतील कार्यरत सर्व शिक्षिकांनी राखी परीक्षण करून ज्या राख्यांची बक्षिसांसाठी निवड केली त्या राख्या सीमेवर भारतीय सैनिकांना पाठविण्यात आल्या.बक्षिस पात्र राख्यांमध्ये इयत्ता आठवी अ ची खुशी बाविस्कर, इयत्ता आठवी ब च्या नितु चौधरी, रुपाली कोळी, इयत्ता आठवी क च्या निकिता जाधव, भाग्यश्री पाटील यांचा समावेश आहे.श्रीमती द्रौ. रा.कन्याशाळेच्या या उपक्रमात करुणा क्लब चे विशेष सहकार्य लाभले.सैनिकांसाठी राखी या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून कार्यक्रम यशस्वीततेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षका व शिक्षेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींचे सहकार्य लाभले.