अमळनेर(प्रतिनिधी) स्वातंत्र्य भारताचा अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा केला जात आहे. तसेच गांधलीपुरा भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीला शहरातील तरुण एकत्र येऊन बहारदार कार्यक्रमच सूत्रबद्ध नियोजन करतात आणि आपलं देश प्रेमव्यक्त करण्याची नामी संधी सोडत नाहीत. सर्व जाती धर्माच्या नेत्यांना सुद्धा एकाच मंचावर सन्मानित करतात आणि वातावरणात राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतात. हि अतुलनीय घटना पुन्हा अमळनेरात हजारोंच्या उपस्थितीत आणि भर पावसात मुशायरा संपन्न होतांना जाणवते
होती.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनात स्वातंत्र्य सैनिक अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेन्टर आणि सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित "एक शाम देश कि आजादी के नाम" या कार्यक्रमांतर्गत शानदार कवी संमेलन(उर्दू मुशायरा) आणि जिल्ह्यातील अनेक सामाजिक क्षेत्रातील उच्च कोटीच योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते.त्याप्रसंगी खान्देश व परिसरातील सुप्रसिध्द
मान्यवर कवींमध्ये कासीम उमर (समन्वयक,जळगाव),रागिब बियावली(यावल), अकरम कुरेशी (जळगाव), सूत्रसंचाल -जमील साहिर (मालेगाव),साबीर मुस्तफा आबादी ( चोपडा),सलीम सूट ऑन ( कॉमेडियन,बुऱ्हाणपूर),अंजर मुस्तफा आबादी( चोपडा),सोहेल आजाद(मालेगाव),यासीम तनहा,एम तरबेज(जळगाव),मतीन अन्वर(धुळे),युनूस अमलनेरी (अमळनेर),फरीद बशर( चाळीसगाव) यांनी प्रमुख हजेरी लावून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते .
प्रारंभी उर्दू शायर यांनी देशप्रेमावर अधोरेखित करीत शेर सादर केला होता.
"कोई स्थान लिखेंगे ना पाकिस्तान लिखेंगे,
है सबसे अच्छा अपना मुल्क अपना हिंदुस्तान लिखेंगे,
सवाल आ जायेगा जिस दिन तिरंगे तेरी इज्जत का,
हम अपने खून के कतरों से तेरी शान लिखेंगे"
जागतिक महामारीत कोविड योद्धा आणि अन्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांचे समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित
समाजरत्न पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला ते खालील प्रमाणे..
डॉ.करीम सालार, फारुख शेख अब्दुला, अन्वर उस्मान शिक्कलगर,रमेश घोगले, जयपाल हिरे(पोलीस निरीक्षक, अमळनेर),चेतन शाह, गौतम सपकाळे, राजू शेख, डॉ अनिल शिंदे,सुभाषआण्णा चौधरी, ऍड राहील काझी, पन्नालाल मावळे, सय्यद सईद अ. हमीद (धरणगाव)मझर लियाकत पठाण,(जळगाव) महेंद्र पाटील ( फोटोग्राफर), यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशांत सरोदे(मुख्याधिकारी),राकेश जाधव(डीवायएसपी),शिरीष चौधरी(माजी आमदार) प्रा अशोक पवार,हरी भिका वाणी,मोहम्मद शफी भाया तेली, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव,हाजी कादर जनाब,नसीर हाजी साहाब, ऍड तिलोत्तमा पाटील, माधुरी पाटील, गौतम मोरे, बन्सीलाल भागवत, गोकुळ बोरसे,पत्रकार उमेश धनराळे,अमीर खाॅ क़ुरेशी , ओमकार चव्हाण सर,मुन्ना पत्रकार,आबिद पत्रकार,गिरिश पाटील, सुनील अहिरराव, ऍड भांडारकर, प्रीतम बग्गा,सनी गायकवाड,राजू चांडाले,संतोष लोहोरे विक्की गोगले,पप्पू कलोसे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक रियाज शेख , इक्बाल शेख, मुक्तार खाटीक, इम्रान खाटीक,ताहेर शेख,जाकीर शेख मुस्तफा शेख, कमा पलंबर, लइक खान, रहिम मिस्तरी,मुश्ताक सर,अताउल्लाह सर ऍड रज़्ज़ाक शेख, ऍड रियाज़ काझी, आकिल सेठ,मट्या खाटीक,जाकीर रद्दी वाले,इकबाल क़ुरेशी, जाकीर मेवाती,शराफत अली,आरिफ भाया,जाकीर खाटीक सर बाबा शेख फारुक सुरभी,इकबाल शेख,हाजी सलीम बागवान, मुशताक बागवान,सईद M I M, अलीमशेख,अजीम (शोला)रियाज़ ठेकेदार,दिलावर काझी,करीम हाजी,आबिद अली,जलाल p o p, परिश्रम घेतले.
यूनुस अमलनेरी यांनी आपल्या विशेष शैलीत ....
"अगर वो आईना होंगा ऐसा हो नही सकता...
वो टूटा फूटा हो सकता है झूठा हो नही सकता..
कई कुर्बानिया शामिल हैं इसकी सरबलंदियोमे
किसीके बाप से नीचा तिरंगा हो नही सकता"
पेश करून रसिकांची मने जिंकलीत.
धुळे येथील मतीन अनवर यांनी
कश्मीर चा उल्लेख करीत...
"दो दिल जो अलग करदे वो शमशीर नही है
जो क़ैद करे हम वो जंजीर नही है
यह भारत के सपूतों कि है जालिम
कश्मीर तेरे बाप की जागीर नही है"
सांगत अधिक रंगत भरली.
पावसाच्या हजेरीतही हॉल भरगच्च भरलेला होता.शेवटी संयोजक रियाज शेख यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
खान्देश समाचार
संपर्क 9145442324

