अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद तर्फे आज उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात असे म्हटले आहे की, राजस्थान सुराणा गावात ९ वर्षीय निष्पाप इंद्र कुमार मेघवाल या विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केली जाते ; ही अत्यंत संतापजनक बाब असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे तसेच अत्यंत निंदनीय अशी घटना असून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहोत.
आपला देश एकीकडे स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिवस साजरा करीत असतांना पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून या देशात शिक्षकासारख्या नैतिक व मानवतावादी क्षेत्रात वावरणा-या व्यक्तीने जातीय आकसबुद्धीने अनुसूचित जातीच्या निष्पाप चिमुरड्या इंद्र कुमार मेघवाल या मुलास निर्दयीपणे मारहाण करून त्याचा बळी घ्यावा ही अत्यंत लांच्छनास्पद,भेदभावात्मक घटना आहे म्हणून प्रस्तुत घटनेची कसून चौकशी होऊन,जलदगती न्यायालयात संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सदरचे निवेदन आम्ही आपल्या मार्फत सादर करीत आहोत.
त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष तथा मा.नगरसेवक नरेंद्रभाऊ संदानशिव,ॲड.एस एस ब्रह्मे,प्रा.डॉ.विजय तुंटे,प्रा.डॉ.राहुल निकम
,प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव,सोमचंद संदानशिव,प्रा.मुकुंद संदानशिव,पत्रकार प्रा.विजय गाढे,पत्रकार विजय संदानशिव,बापुराव संदानशिव,विनोद बिऱ्हाडे,प्रा.माधव भुसनर,
गौतम मोरे,दिनेश बिऱ्हाडे,मंगल सपकाळे,बाळासाहेब सोनवणे,विजय बिऱ्हाडे,धीरज ब्रह्मे,तुषार संदानशिव,इत्यादींच्या निवेदनावर सह्या असून मा.प्रांत साहेबाच्या अनुपस्थितीत,अव्वल कारकून भुषण पाटील यांनी निवेदन स्वीकारले तसेच प्रत- माहिती तथा पुढील कारवाईसाठी
1.मा.अशोकजी गेहलोत,
मुख्यमंत्री राजस्थान राज्य.
2.मा.गृहमंत्री,
राजस्थान राज्य.
3.मा.अध्यक्ष,
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग,
नवी दिल्ली यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.
खान्देश समाचार...
