अमळनेर:-(प्रतिनिधी) आमदारांना राज्यातील प्रश्न व समस्या मांडण्याचे व निराकरण करण्याचे अधिकार आहेत मात्र भाजपचा आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात बोलताना सरसकट सर्व शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करण्याबाबत आणि त्यांच्या कार्यक्षमतेबाबत अपशब्द वापरले आहेत. शिक्षकांमुळे देशातील संस्कृती मूल्य लोकशाही टिकून आहे. मात्र दोषी शिक्षकांविषयी आपण न बोलता सरसकट राज्यातील सर्व शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करीत आहे. अमळनेर तालुक्यातही विविध संघटनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत बंब यांचा निषेध व्यक्त करत
उपविभागीय अधिकारी सो सिमा आहिरे मँडम च्या मार्फत निवेदन देऊन
मुख्यमंत्री व विधानसभेचे अध्यक्ष यांनी आ.बंब यांना समज देऊन शिक्षकांची माफी मागण्यास सांगावे अन्यथा शिक्षकांच्या नाराजीचे व रोशाचे परिणाम शासनाला भोगावे लागतील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर एस. एन. पाटील, आर जे पाटील, संजय पाटील, सुशील भदाने, बी एन पाटील, राहुल बहिरम ,डी.ए धनगर ,ईश्वर महाजन ,निरंजन पेंढारे आशिष शिंदे, एन.डी. विसपुते ,मनोहर पाटील, प्रभुदास पाटील, रोहित तेले, उमाकांत हिरे, पी.एस विंचुरकर सह अनेक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
खान्देश समाचार...
