अमळनेर(प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा,अमळनेर अंतर्गत घेण्यात येणाऱ्या 'वर्षावासाच्या' धम्म प्रवचन मालिकेत चौथ्या पुष्पाला 31 जुलै रोजी रविवारी सायं 5:30 वा.सांस्कृतिक बुद्ध विहार फरशी रोड अमळनेर येथे 'चार ब्रह्म विहार' या विषयावर प्रा.डॉ.सी.एम नेतकर यांनी प्रबोधनात्मक व्याख्यान दिले. त्यात त्यांनी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले 'चार ब्रह्म विहार' किंवा भाव सृष्टीतील प्रत्येक मानव,पशु,पक्षी,प्राणी, इ. मध्ये आढळून येतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये या चारही भाव किंवा विहारांची मशागत करण्यासाठी दर वर्षाला भारतीय बौद्ध महासभे तर्फे, वर्षा वासाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मैत्री,करुणा,मुदिता,उपेक्षा हेचारही भाव ज्या व्यक्तीमध्ये आढळून येतात. अशा व्यक्तीला असामान्य व्यक्ती म्हटले जाते. अशा व्यक्तीने लाभ,लोभ,द्वेष,मस्सर, मोह,माया यांचा त्याग केलेला असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे सर्वांशी प्रेमाचा संबंध असतो.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी संदीप सैंदाणे,अर्जुन संदानशिव,मिलिंद निकम,बापूराव संदानशिव ,द.रू.सैंदाणे गुरुजी,ए.एन. घोलप,श्रीकांत खैरनार,धीरज ब्रह्मे.राज गव्हाणे. चंद्रकांत संदानशिव इत्यादींची समाज बांधव उपस्थिती होती.
खान्देश समाचार,अमळनेर
संपर्क -9145442324
