अमळनेर:-(प्रतिनिधी)येथील सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार प्रा.जयश्री दाभाडे यांना निर्वाण फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय सवित्रीज्योति सन्मान 2022 जाहीर करण्यात आला आहे.
या संदर्भात प्रा.जयश्री दाभाडे यांचे नॉमिनेशन मागविण्यात आले होते. देशभरातील खऱ्या अर्थाने तळा गाळातील घटकांसाठी कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या संस्थे मार्फत केला जातो. प्रा दाभाडे ह्या सातत्याने वंचित, दलित,आदिवासी, महिला,बालक यांच्या साठी उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात अत्यन्त कमी वेळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी ठसा उमटवला आहे.अनेक आंदोलने,उपोषण, अर्ज, निवेदने या मार्फत समाजातील अति सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी प्रशासनाकडून न्याय मिळविला आहे.वेळ प्रसंगी समाजासाठी तुरुंगवास पत्करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवली आहे. प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून कार्य करणाऱ्या प्रा.दाभाडे यांनी गेल्या 26 वर्षांपासून निस्वार्थीपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे. आपला वेळ,पैसा,बुद्धिमत्ता इ समाज,वंचित घटकांसाठी त्यांनी दिला आहे. या सर्व कार्याची दखल आता पर्यंत अनेक अशासकीय,शासकीय पातळीवर घेण्यात आली असून 57 पुरस्कार प्रा.दाभाडे यांना प्राप्त झाले आहेत.आता हा 58 वा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात राज्य पातळीवर दखल घेऊन सन्मानित करण्यात आले आहे.
स्क्रूटिनी समिती मार्फत सर्व माहिती तपासून पाहिल्यानंतर आलेल्या नॉमिनेशन मधून वर्गीकरण करून राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा केला जातो. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह,मानपत्र, आणि मानाचा फेटा असे आहे.सदर पुरस्कारांचे वितरण पुढील महिन्यात नाशिक येथे होणार आहे.
प्रा.जयश्री दाभाडे यांना जाहीर झालेल्या ह्या राज्यस्तरीय पुरस्काराने निश्चितच अमळनेर करांची देखील मान उंचावली असून अमळनेर चे नाव राज्य पातळीवर गेले आहे.प्रा.दाभाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
मला मिळालेला हा राज्य स्तरीय सावित्रीज्योति सन्मान निश्चितच अभिमानास्पद आहे.महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार आणि तेही सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल मिळणे ही खूप अभिमानाची बाब आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात काम करतांना घेतलेले कष्ट आणि मेहनत मला आज खऱ्या अर्थाने कळत आहे.आणि अश्या दोन महान सामाजिक श्रेष्ठांच्या नावाने पुरस्कृत होणे यासाठी खूप मोठे भाग्य लागते.
*नुकतेच माझ्या घरी एका सावित्रीचा म्हणजे "साऊ" चा जन्म झाला आहे.हो माझ्या नातीचे नाव मी "साऊ" ठेवले असून याच कालावधीत सावित्री ज्योती सन्मान जाहीर होणे हा दुर्मिळ योगायोग आहे..*
*महात्मा फुले सावित्रीबाई यांना साऊ म्हणत असत...*
सतत कार्य सुरू आहे. गेल्या अनेक वर्षात मी माझ्या कार्यात उसंत घेतली नाही. पुरस्कारांनी जबाबदारी वाढते.अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते.अर्थातच काम करत असताना अनेक अडचणी येतात पण पुन्हा अश्या पुरस्कारांमुळे नव्याने उत्साह निर्माण होतो. अमळनेर करांनी मला खूप प्रेम व सहकार्य दिले आहे.त्यामुळे मी कार्य करू शकते असेच सहकार्य असू द्यावे _प्रा.जयश्री दाभाडे...


