अमळनेर:(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्याचे नाव रक्तदात्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे, याच गोष्टीचा विचार करून पत्रकार दिपक प्रजापती यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच रक्तदान चळवळ गती मिळण्यासाठी या व्यापक दृष्टिकोनातून रक्तदान मोहीम राबवत आज रक्तदान करण्यात केले, याप्रकारे पत्रकार प्रजापती यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
तसेच अमळनेर येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे दाखल असलेल्या महिलेस अत्यंत अत्यावश्यक रक्ताची गरज होती, ते कळतात माळीवाडा येथील जगदीश महाजन यांनी त्या महिलेसाठी रक्तदान केले व आपला माणुसकीचा धर्म निभावला.
त्या त्याप्रसंगी अमळनेर तालुक्यात रक्तदान चळवळ गतिमान करणारे मनोज शिंगाणे पत्रकार प्रवीण बैसाने,डॉ. दिपक पाटील,विक्की चौधरी, मोनु महाजन इत्यादी उपस्थित होते.
प्रविण बैसाणे,अमळनेर ✒️
