अमळनेर:(प्रतिनिधी) अमळनेर येथील एका गुन्ह्यात आरोपी तब्बल दहा वर्षांनी अमळनेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमळनेर पोलीस स्टेशनला कलम 324 वगैरे अंतर्गत 2013 रोजी गुन्हा दाखल झाला होता, सदर गुन्ह्यातील फिर्यादीस आरोपी कालू उर्फ विशाल दुर्गादास जाधव रा.गांधलीपुरा याने फिर्यादी नाचत असताना धक्का लागल्याने आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर ठोसा मारून त्याचा हातातील वस्तराने गळ्यास कंठ्याजवळ व पायाच्या मांडीवर मारून दुखापत केली होती. तेव्हापासून आरोपी फरार झाला होता. सदर गुन्हाच्या तपास पूर्ण करून मा. न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल होते.
आरोपी हा गुन्हा केल्यानंतर अमळनेर शहरातून निघून गेला होता.२०१३ पासून आज पर्यंत फरार होता. मा.न्यायालयाने त्याच्या विरोधात स्थायी वॉरंट देखील काढले होते. यापूर्वी देखील आरोपीचा शोध घेणे कामे मा. पोलीस अधीक्षक सो. यांच्या आदेशान्वये वेळोवेळी पोस्ट अभिलेखा वरील पाहिजे आरोपीचा शोध घेणे कामी तपास पथक पाठवण्यात आले होते परंतु तो मिळून येत नव्हता.
सदर गुन्ह्यात 10 फेब्रुवारी 2019 रोजी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सदरच्या आरोपी हा त्याचे नाव बदलून मध्य प्रदेश येथील इंदोर शहरात राहत असल्याची माहिती मिळाले वरून त्यांना पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे व त्यांच्यासोबत पोलीस नाईक मिलिंद भामरे पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे अशांना योग्य त्या सूचना देऊन रवाना करण्यात आले होते, त्याचप्रमाणे आरोपी कालू उर्फ विशाल दुर्गादास जाधव याचा ठावठिकाणा बाबत कोणतीही माहिती नसताना इंदोर शहरात त्याच्या शोध घेत असताना नमूद पोलीस पथकास तो दिनांक ११ फेब्रुवारी 2023 रोजी रात्रीच्या सुमारास दिसून आल्याने पोलीस पथकास पाहून तो पडू लागला असता त्यास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय चतुराईने पकडून अमळनेर पोलीस स्टेशनला हजर केले असून नमूद गुन्हात अटक करण्यात आली आहे.
दहा वर्षापासून प्रलंबित गुन्ह्यातील आरोपी अमळनेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केल्यामुळे, अमळनेर पोलिसांमार्फत होत असलेल्या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईचे तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे पोलीस नाईक मिलिंद भामरे, पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे तसेच अमळनेर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.खानदेश समाचार...
प्रवीण बैसाणे,अमळनेर
