अमळनेर(ग्रामीण प्रतिनिधी उमाकांत बेहरे )अमळनेर तालुक्यातील पळासदडे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. च्या नवनिर्वाचित व्यवस्थापक समिति सदस्या च्या " पदाधिकारी निवडणूक" बाबत च्या बैठकीत निर्वाचित सदस्या नी चेअरमन पदी श्री.रमेश शांताराम पाटील यांची तर, व्हा. चेअरमन पदी कल्पनाबाई प्रभाकर पाटील यांची निवड केली बैठकी च्या अध्यक्ष स्थानी
श्री एस. पी. महाजन, अध्यासी अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी पळासदडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. तथा सहकार अधिकारी ( द्वि श्रे) अमळनेर यांच्या अध्यक्षते खाली दिनांक 01/04/2023 रोजी सकाळी 10:30 वा. संस्थे चे कार्यालय पळासदडे येथे पार पडली , अधिकृत घोषणा झाल्या नंतर मा.सरपंच विकास कैलास पाटील यांनी व सूंनदा गणेश पाटील नव निर्वाचित पदाधिकार्या चे सत्कार केले तसेच सचिव श्री गुलाब पाटील, शिपाई रवींद्र सैंदाणे,तसेच संस्थे चे संचालक नथ्थू झुलाल पाटील, लोटन सहादु पाटील, शांताबाई उखा शिंदे, प्रशांत पिताबंर पाटील, शिवाजी साहेबराव पाटील , सुनंदा गणेश पाटील, बंडू यशवंत पाटील, लाला आत्माराम पाटील, यादव तोताराम मांग, नाना अभिमन पाटील, शिवराम रावण पाटील यांचे सहकार्य लाभले.
