अमळनेर(प्रतिनिधी)आज अमळनेर येथे आदिवासी पारधी समाज व्यायाम शाळा तर्फे श्रीराम नवमी निमित्त कुस्ती दंगल चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कुस्ती दंगलीसाठी पैलवान व कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
कुस्ती दंगल आज 29 मार्च रोजी दुपारून ३ ते ६ या वेळेत अमळनेर येथील इंदिरा गांधी भवन च्या पाठीमागे सुजान मंगल कार्यालयासमोर मोकळ्या जागेवर आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमात पंच मंडल ईश्वर पारधी,रामदास पारधी,बाजीराव पारधी असणार आहेत.
आदिवासी पारधी समाज व्यायाम शाळा संस्था अमळनेर कुस्ती आयोजन अध्यक्ष भरत चंदा पवार,सचिव जय पारधी,उप जीतू पारधी आहेत.
तसेच अमळनेर शहरातील आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील,दिलीप लालवानी, मा.नगरसेवक नरेंद्र संदानशिव,मोहन सातपुते,संजय पवार,विक्रांत पाटील,विक्की जाधव,शक्ति भाऊ,रवि भाऊ,धनराज पवार,भीमराव पवार ,अप्पा भाऊ,राजा पारधी,हिम्मत पारधी,अनिल मराठी,पूनम पवार,शुभम पारधी इत्यादी उपस्थित राहणार आहे.
मोठ्या संख्येने कुस्ती प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

