अमळनेर:(प्रतिनिधी) अमळनेर येथे क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या शहीद दिनानिमित्त आदिवासी पारधी समाज महासंघ यांच्यातर्फे अमळनेर येथील नगरपरिषद जवळील क्रांतिवीर समशेर सिंग पारधी यांच्या स्मारकाजवळ समाज बांधवांकडून अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.
क्रांतिवीर समशेरसिंग पारधी हे पारधी समाजाचे क्रांतिकारक होते. इंग्रजांविरुद्ध झालेल्या 1857 च्या लढाईत त्यांनी पारधी समाजाचे नेतृत्व केले होते. क्रांतिकारी समशेर सिंग पारधी यांच्या १ एप्रिल रोजी शहीद दिवस असल्याने समाज बांधवांकडून श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी पूनम पारधी, मनोज पारधी,भीमराव पवार,भरत पवार ,जय पारधी,सागर पारधी,अमोल शिंदे,सुमित पारधी,राकेश पारधी, सुनील दाभाडे,विजय पवार,अनिल मराठी,मनोज चौहान,शुभम पवार, राजा सोनवणे, आदिवासी पारधी समाज महासंघ गांधलीपुरा,पारधी वाडा, जय माता दि मित्र मंडळ,अमळनेर तसेच समाज बांधव उपस्थित होते.
