अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील कुख्यात गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याचा वर पुन्हा एमपीडीए अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.तसेच ठाणे कारागृह येथे रवानगी करण्यत आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त अशी की, दाऊद उर्फ शुभम देशमुख काही दिवसापूर्वी एमपीडीए अतर्गत कारवाईत कारागृहातून सुटल्यांनतर शहरातील ढेकू रोड भागातील जयंत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करून फरार झाला होता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी त्याचा शोध घेऊन धुळे येथून त्याला ताब्यात घेतले होते. त्यांनतर या कुख्यात गुन्हेगाराला नंदुरबार कारागृहात रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी प्रस्ताव तयार करून डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्यामार्फत पुन्हा दाऊद उर्फ शुभम देशमुख याचा विरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव पाठवण्यात आला होता . सदर प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजूर केल्यानंतर शुभम याला ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.या कार्यवाही सहा.पो नि. अजित साळवे,हे.कॉ किशोर पाटील, प्रशांत पाटील,चरण पाटील, नितीन मनोरे यांनी परिश्रम घेतले होते.
खान्देश समाचार अमळनेर
