अमळनेर(प्रतिनिधी - खान्देश समचार न्युज नेटवर्क)- अमळनेर शहर हे संतांची भूमी असून, प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाते. त्यातच प्रामाणिकपणाचे दर्शन बघायला मिळाले.अमळनेर शहरामध्ये आठवडे बाजारात गीता प्रोव्हिजन जवळ श्री. कृपा वेफर्स चे दुकान हात गाडीवर चालवणारा किशोर भैय्या हा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रामाणिकपणे चालवतो.कालच अचानक त्याच्या बँक खात्यावर पाच लाख रुपये क्रेडिट झाल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला. की एवढे पैसे आले कुठून? याचा शहानिशा, चौकशी करण्यासाठी त्याने बँकेत गेला. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले त्याचा हा प्रामाणिकपणा मुळे अमळनेर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर येथील आठवडे बाजार येथे असलेल्या श्री.कृपा केळी,बटाटा वेफर्सच्या दुकानात कार्यरत असतो ,याच दुकानावरून किशोर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह बघतो, आपल्या खात्यात एवढी मोठी रक्कम आल्यानंतर न डगमगता , प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता जपूली.
बँके खात्यात आलेले पाच लाख रुपये कोणत्या संदर्भात आहेत ते जाणून घेण्यासाठी त्याने जे तत्परतेने बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले..
बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याने लवकरात लवकर त्या पैशांची माहिती मिळवली आणि त्या व्यक्तीच्या खात्यात ते पैसे परत केले.
या प्रसंगामुळे समाजातील प्रामाणिकता आणि नीतिमत्ता यांचे महत्व अधोरेखित होते. किशोरच्या या कार्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांनी आणि बजरंगशेठ अग्रवाल यांनी त्याचे कौतुक केले, ज्यामुळे समाजात चांगल्या वर्तनाचे एक आदर्श उदाहरण निर्माण झाले.
अशा प्रकारच्या व्यक्तींमुळे आपल्याला विश्वास बसतो की प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचे मूल्य कधीही कमी होत नाही. किशोरच्या कृत्यामुळे समाजातील अगदी सामान्य व्यक्ती देखील महत्त्वाचे कार्य करू शकतात आणि चांगल्या गोष्टींची एकत्रित भावना जपून राहू शकते. त्याच्या या कर्तृत्वाचे आणि आचारधर्माचे सर्वत्र कौतुक होत असून, खऱ्या अर्थाने मानवतेचा चांगल्या नीतिमत्तेचे दर्शन किशोर भोई यांच्या रूपाने दिसून येत आहे.
खान्देश समाचार
संपादक प्रविण बैसाणे..
