अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील ताडेपुरा भिम नगर येथील रहिवासी यांना नुकतीच रेल्वे विभागामार्फत पदोन्नती जाहीर करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे, अमळनेर येथील ताडेपुरा भागातील दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुखदेव संदानशिव यांचे सुपुत्र आर पी एफ जवान प्रदीप संदानशिव यांना भारतीय रेल्वे विभागामार्फत त्यांच्या कर्तव्य,मेहनत, इमानदारी व प्रदीर्घ सेवा लक्षात घेता त्यांना असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या सेवाकाळात अनेक धाडसीचे कार्य, अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्याचे त्यांचे कार्य आहे.
रेल्वे विभागात अमळनेरकरांचे कुठलीही अडचण असल्यास ते तात्काळ धावून जात असल्याचे आतापर्यंतचे नागरिकांचे अनुभव आहेत, त्यामुळेच त्यांच्या पदोन्नतीमुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खान्देश समाचार...✍️
मुख्य संपादक - प्रविण बैसाणे
