न.पा अग्निशमन दला तर्फे शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली.....
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहराचे वैभव असलेले अंबर्षी टेकडीला अचानक आग लागली असून सुमारे २५ हजार झाडे जाळून खाक झाल्याची घटना आज रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. सुमारे साडे तीन तास आगीचे तांडव सुरूच होते. पर्यावरणाला मोठी हानी झाल्याचे लक्षात येत आहे. या भागात अनेक समाजकंटकांच्या वावर असून तसेच टेकडीला यापूर्वी ८ ते १० वेळा आग लागून नुकसान झाले आहे असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
आज दुपारी अचानक टेकडीला आग लागल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना मिळाली होती. त्यांनुसार यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी ,दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जफर पठाण , मच्छीन्द्र चौधरी , सत्येंन संदानशिव,आकाश संदानशिव, भिका संदानशिव ,आकाश बाविस्कर याना दोन मोठे व एक लहान बंब व आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर घेऊन टेकडीवर पाठवले. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्याने आग विझवत होते तर त्यांचा मदतीला अंबर्षी टेकडी ग्रुपचे सदस्य , महिला हाऊसिंग ट्रस्ट च्या महिला शर्थीचे प्रयत्न करून आग विझवत होते. साऱ्यांच्या प्रयत्नाने सुमारे साडे तीन तासाने आग विजवण्यास यश आले. सुरवातीला हनुमान टेकडीकडील भागाला आग लागली असल्याचे समजले होते. त्यांनतर आग पसरत पसरत नक्षत्र वन , अमृत वन , रोटरी वन ,आयएमए वन जळून खाक झाले. ११११ गटातील काही भाग देखील जळाला. टेकडीवर सुमारे ४५ हजार झाडे लावलेली आहेत. एक प्रकारे जंगल वसले असून याठिकाणी पक्षी ,प्राणी , सरपटणारे प्राणी यांचा वावर वाढला होता. जमिनीची धूप थांबवण्यासाठी तसेच प्राण्यांना ,पक्ष्यांचे घरटे सुरक्षित राहावेत म्हणून जमीनीवरील गवत जैसे थे ठेवण्यात आले होते. या टेकडीच्या संवर्धनासाठी शहरातील
अनेकांनी योगदान दिलेले आहे. टेकडी ग्रुप नियमित देखभाल करतो. ५ हजार पिंपळाची झाडे आणि इतर अशी सुमारे २५ हजार झाडे जळून टेकडीचा ५० ते ६० टक्के भाग जळाला आहे.
अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन टेकडी ग्रुप निर्माण करून खूप मेहनतीने एक एक झाडांचे संगोपन करत असतात, खरंच त्यांच्या कार्याला सलाम केले पाहिजे, त्या ठिकाणी समाजकंटकांकडून आग लागली किंवा कशी लागली, ही चौकशी होऊन दोशींवर कडक कारवाई झाले पाहिजे, अशी वृक्ष प्रेमींची भावना आहे.
खान्देश समाचार....

