अमळनेर : तालुक्यात वाळू माफीयांवर कारवाईची मागणी होत असताना मात्र अनेक ठिकाणी वाळू माफियांनी वाळूचे ढीग लावून ठेवले असल्याची माहिती येत आहे. आज खान्देश समाचार ने शोध मोहिम घेतली असता या बाबत पुरावे देखील मिळाले आहेत.
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ते फापोरे रास्तावर तब्बल शेकडो ब्रास वाळू अवैध उपसा करून वाळू माफियांनी साठवून ठेवली आहे. मंगरूळ ते फापोरे रास्तावरील अनन्या पोल्ट्री फार्म समोर ही अवैध वाळू पडून आहे. या रस्त्यारून फापोरे व फापोरे येथून मंगरूळ, अमळनेरच्या दिशेने लोकं जा ये करतात, यात महसूल कर्मचारी म्हणजेच संबंधित सजेचे तलाठी देखील असून देखील रस्त्यालगत असलेल्या वाळूवर त्यांच्या लक्ष जात नसेल का ? किंवा त्यांचे कोतवाल आणि इतर लोकं त्यांना माहिती देत नसतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर परिसरातील शेतकऱ्यांनी वाळूचा ढिगारा जप्त करण्याची मागणी आहे.
फापोरे गावालगत असलेल्या बोरी पात्रात देखील वाळू चोरी होत असून त्याकडे देखील प्रशासन लक्ष देत नसल्याचे चित्र असून सर्वत्र कारवाई व्हावी, अशी मागणी तालुक्यातील होऊ लागली आहे.
खान्देश समाचार..
