मुंबई:(प्रतिनिधी)राज्य शासनाने चार ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या निवासी आश्रमशाळा अद्यापही बंद आहेत.
शासकीय व अशासकीय आश्रमशाळेतील इतके विद्यार्थी : २०१८-१९ च्या अहवालानुसार शासकीय व अशासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २,४८,७७९ एवढी आहे. या सर्वच आश्रमशाळा आजपर्यंत बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सामाजिक संघटनांकडून मागणी
आदिवासी समाज रोजगाराच्या शोधात गावाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.
झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे आश्रमशाळा सुरू करण्याची आज गरज आहे.
अधिकारी वर्गाने यासंदर्भात गंभीरपणे विचार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी शाळा सुरू कराव्या, अशी मागणी होत आहे.

