अमळनेर :- पाडसे ते अमळनेर स्वतंत्र बस सुरू करणे बाबत.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यत दिं.०४/१०/२०२१ पासून शाळा नियमितपणे सुरू करण्याच्या आदेश पारित झाला असून , विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा उपलब्ध नसल्याने त्यांना वेळेवर शाळा व प्रॅक्टिकल ला उपस्थिती देता येत नव्हती .,
तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी दिव्येश कैलाश पाटील ,समाधान चुणीलाल पाटील , भूषण शरद बोरसे यांनी भारतीय विद्यार्थी मोर्चा अमळनेर चे अध्यक्ष .विशाल बैसाणे यांना सूचित केले असून संघटनेने आगार प्रमुख अमळनेर बस स्टॅंड यांना लवकरात लवकर शाळेच्या वेळापत्रक नुसार बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले .
निवेदने देण्यासाठी प्रमुख उपस्थिती विशाल बैसाणे (भारतीय विद्यार्थी मोर्चा ता.अध्यक्ष अमळनेर) ,मा.अजय अशोक गव्हाणे( भारत मुक्ती मोर्चा), मा.भुपेंद्र शिरसाठ (BVF) ,मा.अक्षय बाविस्कर (कार्यकारी अध्यक्ष BMP अमळनेर ) , मा.दिव्येश कैलास पाटील,समाधान चुणीलाल पाटील, भूषण शरद बोरसे , आकाश गुलाब कोळी , प्रेम शिवाजी पाटील, भावेश मनोज शिंदे , योगेश भामरे , महेश सोनवणे, पवन राजपूत,हर्षल पाटील,रोशन राजेंद्र पाटील तसेच पंच क्रोशीतील विद्यार्थ्यांच्या सह्या सदर निवेदनावर आहेत.
