श्रीनगर, 06 ऑक्टोबर: मंगळवारी जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दोन तासांच्या आत तीन दहशतवादी (Terror Incident) घटना घडल्या. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा (Lieutenant Governor Manoj Sinha)यांनीही या घटनांवर शोक व्यक्त केला आहे.
पहिली घटना श्रीनगरमधील (Srinagar)इक्बाल पार्कजवळ घडली. ज्यात काश्मिरी पंडित समुदाय आणि बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल बिंदरू यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली. त्याचवेळी, श्रीनगरच्या बाहेरील हवल येथील मदीन साहिबजवळ आणखी एक घटना घडली, ज्यात दहशतवाद्यांनी रस्त्यावरील फेरीवाल्याला गोळ्या घातल्या. तिसरी घटना उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात घडली ज्यात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका मोहम्मद शफी नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
