मुंबई : Moody's upgrades India's outlook : रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody) मंगळवारी भारताच्या सॉवरेन रेटिंगला दुजोरा देताना म्हटले आहे की, देशाचा दृष्टीकोन नकारात्मकवरून स्थिर झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि आर्थिक व्यवस्थेत सुधार होणार असल्याचे नमूद केले. मूडीजने भारताला 'Baa3' सॉवरेन रेटिंग (sovereign rating) दिले आहे, जे जंक ग्रेडपेक्षा फक्त एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे जीडीपीचे रेटिंग सुधारण्यास मदत झाली आहे.
नकारात्मक दृष्टिकोनात बदल
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने एका निवेदनात म्हटले आहे की, "मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने (Moody's Investors Service) आज भारत सरकारच्या रेटिंगसाठी नकारात्मक दृष्टिकोनातून बदल केला आहे आणि देशाचे परकीय चलन, स्थानिक चलन दीर्घकालीन जारीकर्ता रेटिंग आणि स्थानिक चलन रेटिंग अपडेट केले आहे. वरिष्ठ 'Baa3' असुरक्षित रेटिंग दिले आहेत.
अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक बदल
ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या (Moodys) अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक बदल असल्याचे म्हटले आहे. मूडीजच्या या अहवालात भारत 'निगेटीव्ह' मधून रेटिंगच्या 'स्टेबल' श्रेणीमध्ये आला आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे कोरोना काळात बिकट झालेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
