जळगाव जिल्हा अध्यक्षपदी रविंद्र लाळगे यांची निवड
अमळनेर- आजच्या काळात धनगर जमातीच्या हक्क अधिकाराबाबत लक्ष्यभेदी जागृती घडवून आणण्याच्या हेतूने व धनगर समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा मौर्य क्रांती संघाची स्थापना कृष्णा हॉटेल एरंडोल येथे झालेल्या भव्य अशा प्रबोधन शिबिरात करण्यात आली.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. राहूल वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून बन्सीलाल भागवत अण्णा, जळगांवचे माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, विश्वनाथ धनके (शि.वि.अ.), सुरेख लक्ष्मण पारखे से. नायब तहसिलदार, डॉ. प्रा. विजय शिरसाठ, डॉ. संदीप कोतकर, प्रा. भलकार, संजय भुसारी, प्रा. जी. एल. धनगर, डॉ. उमेश गवई, डी.एस. धनगर, आर.सी. भालेराव, श्रावण तेले, सुमित्र अहिरे (शि.वि.अ.), अरुण घोलप संचालक शेंदुर्णी खरेदी विक्री संघ, प्रसिद्ध उद्योजक कृष्णा पितांबर धनगर हे हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत देवरे सर यांनी केले तर समाजाची सद्यस्थिती व होळकरशाहीचा प्रेरणादायी इतहास जिल्हाध्यक्ष मौर्य क्रांती संघ रविंद्र लाळगे यांनी समाजासमोर मांडला जेणेकरून मौर्य क्रांती संघाची भावना समाज बांधवांपर्यंत पोहोचली. प्रशांत लवंग सर यांनी आपल्या व्याख्यानातून समाजाच्या समस्या व त्यासाठी द्यावयाचा लढा याबाबतीत समाजाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले. माजी महापौर सदाशिवराव ढेकळे यांनी समाजऋण फेडण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य सदैव करीत राहिल अशी ग्वाही समाजाला आपल्या विचारातून दिली. प्रमुख मार्गदर्शक तथा राज्य कार्यकारिणी सदस्य बन्सीलाल अण्णा भागवत यांनी समाजहित जोपासण्यासाठी समर्पण भावनेने क्रांती करावी असे आवाहन केले. सामाजिक व राजकीय स्थितीमध्ये समाजाचे स्थान कोठे आहे व होळकरांचा गौरवशाली इतिहास जाणून घ्या असे भावनिक आवाहन केले.
उद्घाटक म्हणून डॉ. राहूल वाघ यांनी समाज कशा हलाखीच्या स्थितीत जीवन जगतो हे मी व्यवसायातून पाहत आहे. मात्र पारुताई वाघ यांचा वारसा मी समाजाला सहकार्य करून चालू ठेवेल असे आश्वासन दिले. प्रा. विजय शिरसाठ यांनी समाजाने प्रथम 100% सुशिक्षित व्हावे व शिक्षणातून विकास साधावा त्यासाठी प्राध्यापक मंडळी तन मन धनाने योगदान देतील असे नमूद केले. इतर विचारवंतांनीही समाजाप्रती भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना सेवानिवृत्त नायब तहसिलदार पारखे सुरेश लक्ष्मण यांनी समाजाचे आपण देणे लागतो त्यामुळे समाजऋण फेडण्यासाठी मनापासून योगदान द्यावे असे आवाहन केले. आभार संतोष भडांगे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शकम्हणून राज्य कार्याध्यक्ष माथेले सर, खान्देश प्रभारी दासनोर, कवि राजीव हाके, सुमित्र अहिरे, बन्सीलाल भागवत यांनी मार्गदर्शन केले. नितीन सपकाळ, गोपीचंद धनगर, उमेश गवई, नवल धनगर, धनराज मनोरे, प्रशांत पुरुषोत्तम, विठ्ठल सावंत, जगदीश भागवत, योगेश धनगर, रमेश धनगर, समाधान धनगर, सुभाष धनगर, विनोद सूर्यवंशी, जी. एल. धनगर, मनोज रत्नपारखी यांनी परिश्रम घेतले.
शिबिरासाठी एंरडोल येथील कृष्णा हॉटेलचे मालक कृष्णाशेठ धनगर व त्यांचा स्टाफ यांचे अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी जिल्हा कार्यकारिणीची निवड घोषीत करून बन्सीलाल भागवत यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून रविंद्र लाळगे यांची निवड झाल्याचे पत्र देवून सन्मानित केले. यावेळी तालुका अध्यक्ष म्हणून एरंडोल- नवल सुकलाल धनगर, धरणगांव- संतोष माधव भडागे, चोपडा-डी.एस. धनगर, अमळनेर- गोपीचंद बुधा धनगर, पारोळा- विठ्ठल भिकन सावंत, 40 गाव- प्रशांत बळीराम लवंगे तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अरुण मोतीराम घोलप तर उपाध्यक्षपदी रमेशदेव शिरसाठ, आर.सी. भालेराव, योगेश मंगा धनगर यांची निवड होवून सर्वांचा सत्कार करण्यात आला.
