अमळनेर येथील वार्ड क्र. ०२ मधील झालेल्या विकास कामान मध्ये रोडाचे कामे चालू आहे. त्यात खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. त्या कामाचे नांवे भिका पुना पाटील ते जिजाबराव बारकु पा. यांच्या घरापर्यंत व उर्वरित कामाचे इस्टीमेंट प्रति अर्जाच्या मागील बाजुस जोडले आहे. तरी नियमानुसार ज्या कॉन्ट्रक्टर ने काम घेतले आहे त्याने दुसऱ्यांना काम देऊन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. कपची चे प्रमाण रेतीचे प्रमाण कमी करून निकृष्ट दर्जाचे रोड तयार केले आहे. दोन महिने झाले नाही. तो पर्यंत रस्तांच्या दुरवस्था झालेली आहे. यात कॉन्ट्रक्टराने नागरिकाची व नगरपरिषदेचे फसवणूक केली याची तात्काळ चौकशी लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, व कामाची क्लॉलीटी कंट्रोल करून चौकशी व्हावी असे न झाल्यास प्रहार पक्षा तर्फे दिनाक-०३/०१/२०२२ रोजी आमरण उपोषण करण्यात येईल.आणि मला आशा आहे कि आपण शासनाचा नागरिकाचा शासनावर विश्वास राहील आणि कॉन्ट्रक्टवर वचक राहील.असे अमळनेर न.पा.दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
खान्देश समाचार न्यूज..
