अमळनेर :-(प्रतिनिधी )शहरापासून उत्तरेला एक किलोमीटर च्या अंतरावर असलेल्या कुम्हारया मारुती नावाचे दुर्लक्षित मंदिर आहे. परिसरातील नागरिकानी एकत्र येऊन ओसाड माळरानावर अंत्यंत निकृष्ठ जमिनिवर 3/4 वर्षांपासून वृक्षालागवड करून त्यांना पाणी देऊन संगोपन करत आहेत.त्या परिसराचा कायापालट व्हावा म्हणून अनेक दानशुर व्यक्तींनी लोकवर्गनी करून सोईसुविधा करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
परंतू ते प्रयत्न तोकडे पडतात.कोणितरी लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देऊन परिसराचा सर्वागिन विकास करावा अशी जनतेची मागणी आहे. ताबेपुरा,सानेनगर,न्यूप्लाट परिसरातील शेकडो नागरिक दररोज फिरायला जात असतात.जो तो त्यांच्या परीने श्रमदान करत असतात.लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे ही मागणी जोर धरू लागली आहे.
परिसरातील नागरिकाचा श्रमदानातून व परिश्रमातून तेथे हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन गेल्या ८ ते १० वर्षांपासून स्वयं प्रेरणेने केलेले आहे .संबंधीत परिसर हा अमळनेर शहराला लागून असल्यामुळे प्रेक्षणीय स्थळ ,पर्यटन स्थळ ,नाना नानी पार्क, ऑक्सिजन हब ,इत्यादी उद्देशासाठी समर्पित करण्यासाठी नागरिकांचे अथक प्रयत्न करत आहेत..