अमळनेर (शहरप्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंप वीज पुरवठा बेकादेशीर पणे खंडित करून पिकाचे नुकसान करणे व पिकविण्यासाठी जाचक अटी लावून शेतकऱ्यांना पिक विम्या पासून वंचित ठेवणे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू असून सतत आशावादी असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या भरोशावर अनेक पिकाची पेरणी व लागवड केली आहे परंतु या पिकांना नेमके पाणी देण्याच्या कालावधीतच महावितरण कंपनीच्या
अधिकाऱ्या कडून अचानक पणे व बेकायदेशीर मार्गाने शेतकऱ्याच्या शेतातील कृषी पंप वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या एक ते दोन महिन्यापासून अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंप विज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करून सुद्धा अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही थांबवायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान होऊन अगोदरच आर्थिक संकटा सापडलेला शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दुसरी बाब अशी की पूर, अतिवृष्टी, हवामान बदल, रोगराई किवा पावसाचा खंड यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप व रबी पिकाचे दरवर्षी कमी जास्त प्रमाणात नुकसान होते. परंतु पिक विमा कंपन्या कडून जाचक अटी लावुन व अयोग्य नियम वापर करून बहुसंख्य कपन्यां या शेतकऱ्यांना पिक विमा लाभापासून वंचित
ठेवण्यात येत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर अनेक संकट निर्माण झाले आहेत,भारतीय संविधानाच्या कलम 47 नुसार जनतेचे पोषन व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे सरकारचे प्रथम कर्तव्य असते आणि कलम 48 नुसार आधुनिक रीतीने कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असे साविधानात सरकार चालवणा-या लोकांना स्पष्ट निर्देश असतानाही शासन आणि प्रशासनाकडून सविधानातील या कलमांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे,ज्यामुळे शेतकरयांचे पोषण-आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शेती आणि पशुधनही संकटात सापडले आहे. आपणास विनंती की, शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंप वीज पुरवठा खालील बाबीची पूर्तता केल्याशिवाय खंडित करण्यात येऊ नये
असे महावितरण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आदेशीत करावे.शेकऱयांच्या बिलाचा संपूर्ण हिशोब दिल्यानंतर म्हणजे वापर किती, एकूण बील किती,महाराष्ट्र शासनाने किती भरले, शेतक-यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान केल्याशिवाय वीजपूरवठा करू नये, अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रीय किसान मोर्चाने निवेदन अमळनेर तहसीलदार यांना देण्यात आले.
या प्रसंगी राष्टीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी पाटील , जिल्हाध्यक्ष विश्वास पाटील,तालुका अध्यक्ष रमेश पाटील,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे नूर खान,अरुण देशमुख, हरिचंद पाटील,समाधन पाटील,राजेंद्र पाटील,एकनाथ पाटील,रविंद्र पाटील,दीपक पाटील,भैय्या पाटील,प्रवीण बैसाणे जयपाल गिरासे,रमाकांत ठाकूर,समाधन मेराळे,आदि उपस्थित होते .
खान्देश समाचार न्यूज
