अमळनेर:-(प्रतिनिधी) अमळनेर येथील दिशा गॅस एजन्सी मार्फत 9 जानेवारी इंडियन ऑइल ग्राहक दिवसाचे औचित्य साधून श्रीमती शकुंतला सूर्यवंशी तसेच दिनेश रेजा यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन ऑइल गॅस एजन्सीच्या सर्व ग्राहकांना मोफत गॅस शेगडी सर्विसिंग,दुरुस्ती,जन जागृती कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्प मध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी आपल्या शेगड्या दुरुस्त्या करून घेतल्या तसेच ग्राहकांनी दिशा गॅस एजन्सीचे आभार मानले.
सदर कॅम्पच्या आयोजनांमध्ये मेकॅनिकल सौरभ मराठे, ज्ञानेश्वर महाजन, अरुण पाटील आणि एजन्सीचे कर्मचारी नंदकुमार पिंगळे, रमेश पाटील,वसंत पाटील, भटू बोरसे,बाळू मराठे, रवींद्र साळुंखे, जिजाबराव पाटील यांनी परिश्रम घेतले.
खान्देश समाचार न्यूज

