अमळनेर:-(प्रतिनिधी)येथील वयोगट पंधरा ते अठरातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये करण्यात आले होते. सदर शिबिराची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांच्या नावाची संगणकावर नोंदणी करून करण्यात आली. सदर शिबिरासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या माध्यमातून उदंड असा प्रतिसाद दिला व आपले लसीकरण करून घेतले. विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर घ्यावयाची वैद्यकीय स्वरूपाची काळजी याची अतिशय उत्तम व सक्षम स्वरूपाची तयारी शाळेकडून करण्यात आली होती. शाळेचे समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे अतिशय चांगले स्वरूपाचे असे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी भाऊसाहेब सावंत, विशाल सैंदाणे, अहिरे सिस्टर यांचे सुद्धा अतिशय उत्तमरीत्या उपरोक्त शिबिरासाठी सहकार्य लाभले. त्यांनी लसीकरणाचे फायदे व त्याचसोबत मनातील भीती काढून विद्यार्थ्यांना मानसिक स्वरूपात लसीकरणासाठी अनुकूल तयार करून त्याच्यासाठी आनंदमय वातावरण तयार केले. सदर वैद्यकीय शिबिरास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांनी भेट देऊन उपरोक्त शाळेच्या तयारीबद्दल गौरवोद्गार काढले. सदर शिबिरासाठी अनमोल सहकार्य मार्गदर्शन शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षिका एम.एस. बारी, ज्येष्ठ शिक्षक व्हि.पी. बडवे, महेश माळी, सुषमा शहा, व्हि.एस. अमृतकर, श्रावण पाटील, अशोक महाजन, प्रशांत मालुसरे, प्रशांत वंजारी समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे लाभले.
खान्देश समाचार न्यूज
