अमळनेर :-(प्रतिनिधी)पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन आनंदाचा व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. सकाळच्या मंगलमय प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगी झेंड्याला मुख्याध्यापक, समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्यावतीने मानवंदना देण्यात आली. उपरोक्त कार्यक्रमासाठी समस्त शालेय परिसरात सुंदर, आकर्षक सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. राष्ट्र व देशभक्तीपर गीत लावून एक सुंदर प्रकारचे देशभक्तीपर वातावरण निर्मितीही केली गेली होती. सदर कार्यक्रमासाठी रोटरी क्लब अमळनेर विभाग यांच्या समस्त पदाधिकारी हे सुद्धा आवर्जुन उपस्थित होते. तसेच बोहरा समाज द्वारा संघ समाज सेवी कार्य करणारे वालंटियर समूह सुद्धा या उपरोक्त कार्यक्रमात सहभागी झाला होता. मानवंदना कार्यक्रम झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय, देशभक्तीपर तसेच राष्ट्रभक्तीपर निष्ठा जोपासली जावी अशा प्रकारच्या शुभेच्छा समस्त उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अतिथी मान्यवरांना दिल्या. सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षिका एम.एस. बारी, ज्येष्ठ शिक्षक व्हि.पी. बडवे, महेश माळी, व्हि.एस. अमृतकर, प्रशांत वंजारी व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे लाभले.
खान्देश समाचार न्यूज
