अमळनेर:-(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद निवडणूकीचा अनुषंगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कच्चा प्रभाग रचने चे काम सुरू होते.त्या दरम्यान सदर प्रभाग रचना करतांना आयोग व विभागाचा आदेश नुसार गोपनीयता पाळणे ,राजकीय हस्तक्षेप टाळणे अपेक्षित असताना विशिष्ट गटास त्रास होईल,गैरसोय होईल अश्या पध्दतीने प्रभाग रचना झाल्याची चर्चा शहरात सुरू असतांना आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी मा. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे नोटीस दिनांक 21/12/2021 जा. क्र.वशी 1/395/2021 धागा पकडत गोपनीयतेचा भंग झाल्याचे स्पष्ट होत आहे. अश्या अशायची तक्रार निवडणूक आयोग,प्रधान सचिव नगरविकास ,जिल्हाधिकारी जळगांव यांचा कडे केली होती. सदर प्रभाग रचना करतांना राजकीय हस्तक्षेप झाल्याचे जाणवत आहे असा आरोप केला होता. गटनेते पाठक यांचा तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत मा. जिल्हाधिकारी ,जळगांव यांना तात्काळ क्र. रानिआ/नप-2022/सं.क्र.120/का-6 नुसार चौकशी करून अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसे पत्र गटनेते प्रविण पाठक यांना आज रोजी प्राप्त झाले आहे.
वरिष्ठ स्तरावरून चौकशी चे आदेश प्राप्त झाल्याने सदर प्रभाग रचना रद्द करून जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी मार्फत सदर प्रभाग रचना करण्यात यावी असे मत या वेळी प्रविण पाठक यानी व्यक्त केले आहे.
खान्देश समाचार न्यूज
