अंमळनेर (प्रतिनिधी ) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आदरांजली वाहून संपन्न झाली. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते परमपूज्य महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांनी महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अलौकिक अशा कार्याचे वर्णन मनोगत पर भाषणातून व्यक्त केले. असहकार चळवळ मिठाचा सत्याग्रह असो की बॅरिस्टर असताना सर्व भौतिक सुखाचा त्याग करून देशासाठी समाज जीवन या सर्व बाबींचे अमोल सुंदर वाणीत वर्णन केले. शाळेच्या पर्यवेक्षिका एम.एस. बारी यांनी सुद्धा परम पूज्य महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील ज्ञात-अज्ञात प्रसंगाचे अलंकारिक मार्मिक शब्दात वर्णन केले. सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, ज्येष्ठ शिक्षक व्हि.पी. बडवे, महेश माळी, प्रशांत वंजारी समस्त शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचे लाभले.
खानदेश समाचार न्यूज
