अमळनेर :(प्रतिनिधी) अमळनेर येथील बहु चर्चित खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक सुरू असून आज मतदान सुरू आहे, त्यात उमेदवारांच्या नातेवाईकांची तोबा गर्दी केली आहे.कोविळचे कारण देत जिल्हाधिकारी जळगाव यांनी 23 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीला ब्रेक देत स्थगिती दिली होती.
तर काही दिवसांपूर्वी कोरोनाचे नियम व अटी राखून निवडणूक घेण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले होते. व त्यानंतर 13फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येईल असे निवडणूक समितीने जाहीर केले होते. त्या नुसार आज निवडणूक सुरू झाली आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला धाब्यावर बसवून ही निवडणूक सुरू असल्याचे निदर्शनास येते आहे. यात एकही उमेदवाराने मास्क सुद्धा घातलेलं नाहीये. दोन्ही पॅनल मध्ये एक - एक डॉक्टर आहेत. व त्यांना कोविळ परिस्थिती चांगलीच ज्ञात आहे.

मात्र तरी त्यांच्या कडून अश्या पध्दतीच्या चूका होत असतील तर हे योग्य वाटत नाही. कोविळ नियमांचे उल्लंघन करण्यास सहकार पॅनलने चांगलीच आघाडी घेतली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व अन्यथा खाशीची निवडणूक ही कोरोनाची फॅक्टरी ठरेल हे नक्की ! यात तीळ मात्र शंका नाही..!
खान्देश समाचार न्यूज