अमळनेर:-(प्रतिनिधी) एरंडोल नगरपालिका तर्फे स्वच्छ वसुंधरा प्रीमियर लीग जिल्हास्तरीय अंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली होती, त्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आप-आपल्या सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडूंचे संघ या स्पर्धेसाठी पाठवण्यात आल्या होत्या.
भडगाव, एरंडोल, चोपडा,जामनेर ,भुसावळ ,शेंदुर्णी,मुक्ताईनगर, सावदा ,फैजपूर रावेर ,वरणगाव,बोदवड,धरणगाव तसेच आपल्या अमळनेर नगरपालिका कर्मचारी क्रिकेट संघानेही सहभाग नोंदविला होता.
अमळनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सरोदे तसेच आरोग्य निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर न.पा क्रिकेट संघाने अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या फायनल मॅच मध्ये पाचोरा नगरपालिकेवर मात करत दणदणीत विजय मिळविला. विजयाचे शिल्पकार ठरले, कर्णधार गौतम भावलाल बिऱ्हाडे,तसेच शाम करंदीकर,महेंद्र बिऱ्हाडे,गणेश ब्रम्हणे,रोहित कलोसे,योगेश बैसाणे,विशाल बैसाणे,नितीन बिऱ्हाडे,योगेश पवार, रिषि कलोसे,मुकेश कलोसे,रवींद्र कलोसे,विजय सपकाळे,सागर पवार यांनी फायनल सामना जिंकण्यात यांचा मोलाचा वाटा होता.
फायनल सामन्यात प्रोत्साहन म्हणून कदम साहेब,मुकादम अनिल बेंडवाल ज्ञानेश्वर संदानशिव,संदीप बैसाणे, अनिल वाघ, सुनिल बिऱ्हाडे, खली शाह,शुभम घोलप,रोहित अहिरे यांनी परिश्रम घेतले.
अमळनेर नगरपालिका क्रिकेट संघाने जिल्हास्तरीय टूर्नामेंट जिंकल्यामुळे सर्वत्र अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.
खान्देश समाचार न्यूज


