यावल:-(प्रतिनिधी)येथील हबर्डी गावात दि.१६/२/२०२२ रोजी सम्पूर्ण देशात राष्ट्रीय गुरू रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली त्याच प्रकारे हबर्डी येथील ग्राम पंचायत सदस्य सावकारे ताई यांच्या माध्यमातून तसेच शशिकांत सावकारे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा व भगवान रविदास क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने संत रविदास महाराज जयंती कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान) चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.जी पी काकडे होते काकडे यांचे अभ्यास पूर्ण मन्त्र मुग्ध करणारे वक्तव्य ऐकण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती सामाजिक कार्यात काकडे यांचे मनाचे स्थान जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्या बाहेर सुद्धा आहे . कार्यक्रमाचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ता मा.आर बी परदेशी साहेब होते अध्यक्षीय भाषणाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांचा अभंग
*ना देखवे डोळा ऐसा आकांत*
*परपीडा चित्त दुःखी होते*
*भीत नाही आपल्या मरणा*
*दुःखी होते जना न देखवे*
या पासूम करण्यात आली संत रविदास महाराजांनी त्यांच्या काळात समाज सुधारकांचे काम केले संत रविदास महाराज म्हणतात
*जात -जात के फेर में, उलझ रहे सब लोग*
*मनुष्यता को खा रहा,रविदास जात का रोग*
*जात-जात में जात है,ज्यो केलन के पात*
*रविदास माणूस न जुड सके,जब तक जात न जात*
जाती व्यवस्था मानवतावाद धोक्यात आणते व मानवता धोक्यात आल्यास बंधुभाव राहत नाही.जात हे समाज विघटनाचे हत्यार आहे जातीच्या मानसिकतेने जोडला जात नाही म्हणून माणसांनी जाती जातींच्या फेऱ्यातून मुक्त झाले पाहिजे त्या शिवाय माणूस जोडला जाणार नाही बहुजन समाजाची एक जुट होणे काळाची गरज आहे या सोबत तरुणांची संख्या मोठी असल्याने वाढती बेरोजगारी,सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण यावर देखील प्रकाश टाकण्यात आला
संत रविदास महाराजांच्या प्रतिमीचे पूजन भगवान सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच भगवान रविदास फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच कार्य कार्यकारी मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन शशिकांत सावकारे यांनी केले तर सूत्र संचालन भारत मुक्ती मोर्चाचे कुंदन तायडे यांनी केले कार्य कार्यक्रमाचे आभार राजेंद्र बाविस्कर साहेब यांनी मानले कार्यक्रमाला हबर्डी गावातील चर्मकार बांधव हरीश सोनवणे,महेश सावकारे,धनराज सावकारे,विकास सोनवणे,चंद्रकांत सोनवणे,राजेंद्र सोनवणे,मुकेश सोनवणे,सुवडू सोनवणे, सुनील सोनवणे, धनराज सावकारे,सुनील सोनवणे, आनंद जाधव,उपस्थित होते.
खान्देश समाचार न्यूज
