अमळनेर:-(प्रतिनिधी)जळगाव राष्ट्र सेवा दलाची जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक नुकतीच पार पडली.यावेळी श्री शेख सर भिवंडी यांच्या निरीक्षणात संपन्न होऊन कार्याध्यक्ष पदी प्रा अशोक पवार यांची फेरनिवड निवड करण्यात आली.
जिल्हा संघटक म्हणून अजयकुमार पाटील तर राज्यमंडळावर विकास घुले, प्रतिभा शिंदे, नारायण वाघ, सोमनाथ पाटील तर कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रवीण पाटील, पंकज गरुड, हेमंत सोनवणे, सुशील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कल्पना पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीत शेख सर,प्रा अशोक पवार, प्रतिभा शिंदे, प्राचार्य डॉ शांताराम बडगुजर यांची मार्गदर्शने आणि समयोचित भाषणे झालीत.
जिल्ह्यातील सर्व युनिट ला विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपला विचार कसा वाढवता येईल याची गंभीरपणे आखणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
शिक्षक भारती,छात्र भारती, आदी समविचारी संघटनांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका मांडण्यात आली.
प्रसंगी गौतम मोरे ,हमीद शेख अमीर मास्तर,दर्शना पवार,डॉ प्रशांत सोनवणे,प्रभात तडवी,सुनील अहिरराव,विकास घुले,एल एम पाटील, सचिन धांडे,डी एम पाटील,रणजित पाटील,किशोर महाजन,विजय पवार,श्रीमती सिंधू राठोड,रमेश राठोड,नितीन माळी,निलेश इंगळे इत्यादी उपस्थित होते.
खान्देश समाचार न्यूज
