अमळनेर(प्रतिनिधी)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अमळनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा नियुक्या नुकताच मनसे जळगाव जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी जाहीर केल्या.
अमळनेर तालुकाध्यक्ष पदी संदीप पाटील (काटे) तर शहराध्यक्षपदी धनंजय साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे, मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे तसेच राज्य उपाध्यक्ष विजय भोईटे यांचा आदेशाने पक्षाच्या ध्येय धोरणे यांचा प्रचार-प्रसार व पक्ष बळकटीसाठी तसेच मराठी माणसाच्या हक्कासाठी ह्या नियुक्त करण्यात आल्या असून असे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केले .
खान्देश समाचार न्यूज
